Home नांदेड Murder: १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या, धक्कादायक घटनेने खळबळ

Murder: १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या, धक्कादायक घटनेने खळबळ

Murder Case 19-year-old strangled to death

नांदेड | Nanded : नांदेड जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून (Murder)  करण्यात आल्याची धक्कादायक  घटना मुदखेड तालुक्यातील अमदुरा गावात घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत शंकर पवार असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंद्रकांत हा २९ एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, आज सकाळी गावातील झुडपात त्याचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत हा २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, यानंतर तो घरी आलाच नाही. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने चंद्रकांत कुटुंबियांनी नातेवाईक तसे मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र तो तिथेही आला नसल्याचं त्यांना कळालं. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तेव्हापासून पोलीस चंद्रकांतचा शोध घेत होते.

दरम्यान, तब्बल ५ दिवसांनी मंगळवारी (३ मे) चंद्रकांतचा मृतदेह गावातील झुडूपात आढळून आला. एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांतचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी चंद्रकांतचे वडील शंकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Murder Case 19-year-old strangled to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here