Home औरंगाबाद २५ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह हौदात आढळला, तपासात धक्कादायक खुलासा

२५ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह हौदात आढळला, तपासात धक्कादायक खुलासा

Married Woman Murder Case: विवाहितेचा मृतदेह साठवणीच्या हौदात आढळून आल्याने खळबळ, गळा दाबून खून केला व खुनाला आत्महत्या  दाखविण्याच्या प्रयत्नातून बेशिद्धवतेत घरामागील हौदात टाकून बॉडीची विल्हेवाट.

Murder Case body of a married woman was found in a well

वैजापूर:  घरातील पाणी साठवणीच्या हौदात २५ वर्षीय विवाहितेचा मृत्युदेह सापडल्याची घटना सोमवार (दि.१९ डिसेंबर) रोजी शिऊर ता.वैजापूर येथे उघडकीस आली होती. याप्रकरणात मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सबंधित महिलेच्या सासूस व नवऱ्यास जबाबदार धरून दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल  केला होता.

परंतु संशयित घटनेची तालुकाभरात चर्चा झाल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. तपासा दरम्यान पोलीसांनी या प्रकरणात अधिक धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मयत माया दादासाहेब आगलावे (वय २६) हिच्या आई विठाबाई बाळनाथ कराळे यांच्या  फिर्यादीवरून मृत महिलेचा पती दादासाहेब कलिनाथ आगलावे, सासू राधाबाई कलिनाथ आगलावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी  सुरु असताना पोलिसांनी खोलापर्यंत जात सखोल तपास केला असता येथीलच नात्यातील एक व्यक्ती या प्रकरणाचा मुख्य आरोपी  असल्याचा संशय बळावला आणि त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवत चोवीस तासाच्या आत बुधवार दि.२१ रोजी ज्ञानेश्वर बबन आगलावे रा.शिऊर यास ताब्यात घेतले व चौकशी सुरू केली.

समाजात प्रतिष्ठा खराब होण्याच्या धमकीला घाबरून मी स्वतः माया हीचा गळा दाबून खून केला व खुनाला आत्महत्या दाखविण्याच्या प्रयत्नातून मायास बेशिद्धवतेत घरामागील हौदात टाकून बॉडीची विल्हेवाट लावल्याचा जवाब आरोपी ज्ञानेश्वर आगलावे याने पोलिस तपासात दिला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आपण निर्दोष असल्याचे भासवत संपूर्ण प्रकरणाचा दाखल प्रक्रोयच्या घडामोडीत पोलिस ठाण्यात हजर होता. खुनातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर आगलावे हाच असल्याने त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली आणि ज्ञानेश्वर जाळ्यात अडकला खून झाल्यापासून महिलेच्या खून प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नवरा व सासूची चौकशी सुरु होती. परंतु तासादरम्यान नवरा व सासू दोघेही खून केला नसल्याचे सांगत होते. शिऊर पोलिस ठाण्याचे स.पो.नि संदीप पाटील यांनी विशेष तपास मोहीम केली असता या प्रकरणात सासू व नवरा संबधित महिलेच्या मृत्यूला जबाबदार नसून तिसराच कुणीतरी महिलेचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले. यानुसार तपासाची चक्रे फिरवून आरोपी ज्ञानेश्वर यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवून खुनाचा (Murder) घटनाक्रम काढून घेतला. २४ तासांच्या आत आरोपीस ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Murder Case body of a married woman was found in a well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here