Home औरंगाबाद औरंगाबाद हादरले! मित्राची चाकूने भोसकून हत्या -Murder Case

औरंगाबाद हादरले! मित्राची चाकूने भोसकून हत्या -Murder Case

Murder Case Friend stabbed to death

औरंगाबाद | Aurangabad: किरकोळ वादातून तरुणाचा चाकू भोसकून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद शहराच्या बायजीपुरा या भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर सदर तरुण जखमी अवस्थेत लोकांना मदतीची याचना करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोक कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा) दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख अन्वर शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  औरंगाबादचा १८ वर्षीय युवक शाहरुख आणि त्याचा मित्र हैदर बायजीपुरा येथील सिंकदर हॉलसमोर बसले होते. दोघेही तरुण नशेत धुंद होते. दोन्ही मित्रांचे अचानक संवादाचे रुपांतर वादात झाले. वाद इतका टोकाला गेला की, मित्र हैदरने शाहरुखवर धारदार चाकूने वार केले. हैदरने मैत्रीचा विचार न करता शाहरुखच्या कंबर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे शाहरुखला रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर शाहरुख क्षणार्धात जमिनीवर कोसळला. शाहरुखची स्थिती पाहून हैदर तेथून फरार  झाला. जखमी झालेला शाहरुख लोकांना मदतीची याचना करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोक कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. शेवटी रस्त्यावरच शाहरुखचा अंत झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Web Title: Murder Case Friend stabbed to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here