Home अहमदनगर पैशाच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा

पैशाच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा

Murder friend cut his friend's throat in a money dispute

अहमदनगर | Ahmednagar: निंबळक बायपास येथ वाहनचालकाचा खून झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून पैशाच्या वादातूनच मित्रानेच त्याचा गळा चिरल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. विशाल माणिक घायामुक्ते रा. शाहूनगर केडगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी ८ वाजता निंबळक बायपास येथे लामखेडे पेट्रोल पंपाजवळ रामदास बन्सी पंडित या वाहनचालकाचा मृतदेह आढळून आला होता.

मृताच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले होते. मयताचा मुलगा अशोक रामदास पंडित याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. याप्रकरणात विशाल घायमुक्ते यानेच खून केल्याचे उघडकीस आले आहे. मयत पंडित व घायमुक्ते हे एकेकाळी सोबत काम करीत असत. त्यावेळी झालेल्या पैशाच्या देवानघेवाणीतून दोघांत वाद झाला होता. याच वादातून घायमुक्ते यांनी हा खून केल्याची कबुली जबाब दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.       

Web Title: Murder friend cut his friend’s throat in a money dispute


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here