Home पुणे धक्कादायक घटना: भरदिवसा मावस भावाचा ३८ वार करुन खून

धक्कादायक घटना: भरदिवसा मावस भावाचा ३८ वार करुन खून

Baramati Murder Case: घरातच केली हत्या, मावस भावाने हत्या केल्याचे आले समोर.

Murder Mother-in-law killed by 38 stabs in broad daylight

बारामती: बारामतीमधून धक्कादायक घटना घडली आहे. बारामती एमआयडीसीतील रुई परीसरात सख्ख्या मावस भावावर वार करीत त्याचा निर्घृण खुन केल्याचा धक्कादायक प्रकार भर दिवसा घडला. गजानन पवार (वय २८, मुळ रा. वसमत, जि. हिंगोली, सध्या रूई बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी (दि. १) दुपारी १२ च्या सुमारास रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुस गजानन वास्तव्यास आहे. घरातच त्याची हत्या करण्यात आली. गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याने वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलीसांना याबाबत सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रेमसंबधातून एकाची भररस्त्यात धारदार शस्त्राने भोसकून हत्या

हत्या करण्यात आलेल्या युवकावर पोलीसांनी केलेल्या पाहणीत ३८ वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एवढी भयानक पध्दतीने झालेली हत्या पाहून पोलीस चक्रावले. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत.

मुलीचे आंघोळीचे निर्वस्त्र फोटो काढून धमकी देत सहा महिने अत्याचार

पोलिसांनी केलेल्या चौकशीत गजानन हा केशकर्तनालयात काम करतो. त्याच्याबरोबर त्याचा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा. वसमत, जि. हिंगोली) हा देखील काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर तो सतत नशेत असतो,अशी माहिती पोलीसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेताना संतोष सीसीटीव्ही फुटेजमध्ये येथुन जाताना दिसला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने बारामती बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पथक पाठवत संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबविली. पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलीस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे आदींच्या पथकाने संतोषला झडप घालत पकडले. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या तपासात सख्ख्या मावस भावाचा केवळ राग म्हणुन खुन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Murder Mother-in-law killed by 38 stabs in broad daylight

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here