Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विवाहितेचा खून, मृतदेह कालव्यात आढळल्याने खळबळ- Murder

संगमनेर तालुक्यात विवाहितेचा खून, मृतदेह कालव्यात आढळल्याने खळबळ- Murder

Murder of a married woman in Sangamner taluka, body found in a canal

Ahmednagar News | Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल आरती राजेंद्र मुन्तोडे (वय – 35) या महिलेचा मृतदेह( Dead body) सोमवारी सकाळी आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. ही महिला दोन दिवसापासून बेपत्ता होती व तिचाच मृतदेह सापडल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळीवर खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्वी पोलिस ठाण्यात पती राजेंद्र यशंवत मुन्तोडे, दीर रविद्रं यशंवत मुन्तोडे, जाव रंजना रविंद्र मुन्तोडे, सासु अलका यशंवत मुन्तोडे (सर्व रा. शिबलापूर, ता. संगमनेर), नंदई प्रकाश सखाराम गायकवाड व ननंद शिला प्रकाश गायकवाड (दोन्ही रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 81/2022 नुसार भादंवि कलम 302, 498(अ), 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 30 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथिल डाव्या कालव्यामध्ये एक मृतदेह तरगंत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह कालव्यातून बाहेर काढला व तो मृतदेह शिबलापूर येथील बेपत्ता असलेल्या आरती राजेंद्र मन्तोडे यांचा असल्याची खात्री केली.

मृतदेह सापडल्याची माहिती माहेरकडील नातेवाईकांना कळाल्यानतंर त्यानी आश्वी पोलीस ठाणे येथे पतीसह सासरकडील मंडळीवर खूनाचा संशय घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसांनी उपस्थित नातेवाईकांशी संवाद साधत मयत महिलेचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.

याप्रकरणी पोलीस निरिक्षक सुभाष भोये हे पुढील तपास करत आहेत. तर पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Murder of a married woman in Sangamner taluka, body found in a canal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here