अनैतिक संबधास अडथळा ठरलेल्या तरुणाचा विहिरीत ढकलून खून | Ahmednagar Murder
Ahmednagar Murder| Rahata | राहता: अनैतिक संबधास अडथळा ठरलेल्या तरुणाचाविहिरीत पडून मृत्यू झाला असा बनाव करून पुरावे नष्ट केले होते. लोणी पोलिसांनी घडलेल्या अकस्मात मृत्यू घटनेचा तपास करीत या खुनाच्या गुन्ह्याचा सहा महिने तपास करून उलगडा केला. तब्बल सहा महिन्यानंतर मंगळवारी रात्री तालुक्यातील पिंपरी निर्मल गावातील दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालकृष्ण माधव घोरपडे वय ४३ रा. निर्मळ पिंप्री असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता राजुरी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. पोलीस हवालदार जोसेफ साळवी यांच्या चौकशीवरून असे निष्पन्न झाले आहे. बाळकृष्ण यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यास विहिरीत पाण्यात ढकलून देऊन त्यास जीवे ठार मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट केला आहे. पोलीस हवालदार जोसेफ साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी विलास हरिश्चंद्र निर्मळ व त्याचा साथीदार गंगा पारखे दोघे रा. निर्मळ पिंप्री याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी गंगा पारखे यास मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
Web Title: Murder of a young man who was obstructed in an immoral relationship