Home अहमदनगर अहमदनगर येथील तरुणाचा केवळ ५०० रुपयांसाठी खून

अहमदनगर येथील तरुणाचा केवळ ५०० रुपयांसाठी खून

Murder of a youth for only 500 rupees

अहमदनगर | Murder: पाथर्डी तालुक्यातील विकास देवचंद चव्हाण हा रिझर्व बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबाद शहरात गेला असता त्याची शुक्रवारी निर्घुण हत्या करण्यात आली होती.

सिटी चौक पोलिसांनी काही तासांतच संशियीत पकडला असून टँव्हल एजंटच मारेकरी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शाहरुख खान फिरोज खान वय २८ रा. जुना बाजार असे या आरोपीचे नाव आहे. विकासजवळील ५०० रुपये लुटण्याच्या उद्देशाने त्याने परीक्षा केंद्रावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून कब्रस्थानात नेले. तेथे मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला मात्र विकासने विरोध करताच त्याच्यावर चाकूने वार करत खून करून एक हात कापला होता.

शुक्रवारी सकाळी ८ वाजता रिझर्व बँकेची परीक्षा होती. त्यामुळे गुरुवारी रात्री औरंगाबाद शहरात आला होता. बस स्थानकात मुक्कामासाठी थांबला. आणि पहाटे पाच वाजता शाहरुखने एकटा बसलेला दिव्यांग विकासला आपल्या जाळ्यात घेरले. या शाहरुखवर २०१७ रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.   

Web Title: Murder of a youth for only 500 rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here