धक्कादायक! नगरसेवकाच्या भावाची हत्या- Murder
Parner Murder Case: पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक शेलार यांच्या चुलतभावाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
पारनेर: पारनेर नगरपंचायतीचे नगसेवक शेलार यांच्या चुलत भावाची शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये धारदार शस्त्राने खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एकास अटक केली असून दोघे पसार झाले आहेत.
पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक भूषण शेलार यांचा चुलत भाऊ सिध्देश संजय शेलार (20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी विकी खराडे (रा. शिक्रापुर ता. शिरूर जि. पुणे) व त्याच्या इतर दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नगरसेवक भूषण शेलार यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात विकी खराडे व त्याच्या दोघा साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात नमुद करण्यात आले आहे की, त्यांचा चुलत भाऊ सिध्देश हा शिक्रापूर येथील अजित कारंजे याच्यासोबत पानाच्या टपरीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी (दि.18) तो पारनेर येथे आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी भूषण व त्याची भेट झाली त्यावेळी विकी खराडे हा मला जीवे मारण्याची धमकी देत असून त्याची मला भीती वाटत असल्याचे सिध्देश याने सांगितले होते.
त्यावर विकी खराडेपासून तु दुर रहा असा सल्ला भूषण यांनी त्यास दिला होता. त्यानंतर सिध्देश शिक्रापुर येथे गेला होता. यानंतर मध्यरात्री घटना घडली. बांदल कॉम्लेक्स, पाट वस्ती शिक्रापूर येथे सिध्देश याच्यावर धारधार शस्त्राने तिघा हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले. सिध्देश याच्या हातावर, डोक्यावर, मानेवर वार करण्यात आले आहेत. यानंतर स्थानिकांनी त्यास खाजगी रूग्णालयात हालविले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Web Title: Murder of corporators brother