Home क्राईम नाशिक हादरले! लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या

नाशिक हादरले! लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या

Nashik  Crime: कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

Murder of elder of brother by younger brother

 नाशिक: कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव दामू निकम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  नाशिकच्या कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी हरी दामू निकमअसे संशियीत आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की,  संशयित आरोपी हरी दामू निकम (वय, 50) हा गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मद्यपान करून घरी आला. यावेळी त्याने मोठा भाऊ सदाशिव दामू निकम वय 55 यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यामुळेच सदाशिव निकम यांनी त्याचा जाब विचारला असता हरी दामू निकम याने त्यांच्यावर हल्ला केला.

आरोपीने आपल्या सख्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत सदाशिव निकम हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी फिर्यादी बायडी कैलास सूर्यवंशी यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हरी दामू निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Murder of elder of brother by younger brother

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here