पत्नीकडून पतीची हत्या, अकोलेतील धक्कादायक घटना उघडकीस
Akole Murder Case: पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे उघडकीस, वाकी येथील घटना.
राजूर: दोन दिवसापूर्वी अकोले तालुक्यातील वाकी येथे घरफोडीची घटनेत मधुकर किसन सगभोर यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करत पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे उघडकीस आहे. चोरीचा बनाव करीत मारामारीत पतीची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
राजूर व्यसनी पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्या दिवशी नवरा बायकोमध्ये झालेल्या मारामारीत अकोलेतील वाकी येथील मधुकर किसन सगभोर (वय ४१) याचा मृत्यू झाल्याचे अखेर पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी दिली.
आपला बचाव करण्यासाठी मयत याच्या बायकोनेच घरफोडीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील आरोपी पुष्पा मधुकर सगभोर वय ३६ हिला पोलिसांनी अटक केली आहे.
अवघ्या दोन दिवसांत पोलीसांनी वाकी येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास लावला. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी पुष्पा हिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सपोनि इंगळे यांनी माहिती दिली.
Web Title: Murder of husband by wife, shocking incident revealed in Akole
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App