Home सोलापूर अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीसह प्रियकराचा खून

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीसह प्रियकराचा खून

Breaking News | Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नी व तिचा प्रियकर या दोघांचा कुऱ्हाडीने घाव घालून खून.

Murder of lover with wife due to immoral relationship

सोलापूर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नी अनिता व तिचा प्रियकर श्रीकांत अनिल नरोटे या दोघांचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी चनबसप्पा रेवप्पा सलगरे याच्यासह इतर चौघांना जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नांदणी-बरूर शिवारात हा खून करण्यात आला. यातील मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा रेवप्पा सलगरे (रा. बरूर, ता. दक्षिण सोलापूर) हा घटनेनंतर सोलापूरच्या दिशेने पळून जात होता. परंतु, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांच्या पथकाने त्याला सोलापूर शहराजवळील सलगर वस्ती परिसरातून ताब्यात घेतले.

कल्लप्पा सिद्धप्पा सलगरे, लक्ष्मण चंदू सलगरे, उमेश सुरेश सलगरे आणि नागप्पा माने हे चार संशयित घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. रात्री उशिरा चारही संशयित आरोपी बरूर येथील शेतात लपून बसल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून या खुनात त्यांचा सहभाग किती? या बाबीचा तपास पोलीस करीत आहेत.

दोघांनाही एकाच वेळी संपविले

दोघांना समजावून सांगूनही त्यांनी एकमेकांना भेटणे सुरूच ठेवल्याचा राग मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा सलगरे याच्या मनात होता. घटनेच्या दिवशी पत्नी अनिता व श्रीकांत दोघेही एकत्र दिसल्याने चनबसप्पा याच्या रागाचा पारा चढला आणि त्याने त्या दोघांना एकाच ठिकाणी संपविले. त्यासाठी त्याने चौघांची मदत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Murder of lover with wife due to immoral relationship

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here