Home अकोले अकोले: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

अकोले: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

Breaking News | Akole: पती व पत्नीच्या वादात पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना.

Murder of wife with sharp weapon due to suspicion of character

राजूर: अकोले तालुक्यातील (वय ४६) स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात घोटी शिळवंडी येथे पती व पत्नीच्या वादात पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. १८ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचे उघड झाले हजर झाला आहे.

सोमवारी सकाळी घोटी शिळवंडी येथे संतोष सबा साबळे व सुनीता संतोष साबळे या पती- पत्नीत वाद झाला. त्यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. मात्र, पतीचा पत्नीवर नेहमी संशय असायचा. या वादातून पतीने आहे. दरम्यान आरोपी पती संतोष सबा साबळे धारदार शस्त्राने पत्नीच्या  पाठीवर व डोक्यावर वार करून खून केला अशी माहिती समोर आली आहे. खून केल्यानंतर पोलिसांना माहिती देऊन आरोपी संतोष साबळे हा पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राजूर येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश विष्णू बांबळे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२/४, २५ नुसार पती संतोष साबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, पोकॉ. अशोक काळे, विजय मुंडे, डगळे, महिला पोकॉ. रहाटकळ तपास करत आहेत.

Web Title: Murder of wife with sharp weapon due to suspicion of character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here