Home नाशिक फावड्याने वार करून महिलेचा खून करून पाय तोडले

फावड्याने वार करून महिलेचा खून करून पाय तोडले

Murder Case: मालेगाव तालुक्यातून  धक्कादायक घटना घडली आहे. सोन्या चांदी चोरण्याच्या बहाण्याने महिलेचा खून केल्याची घटना.

Murder woman with a shovel and broke her leg

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दहिदी येथील पाणताची शेवडी परिसरात झालेल्या सुमनबाई भास्कर बिचकुले (२८) या महिलेचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या  खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित आरोपी किरण ओमकार गोलाईत (रा. साजवहाळ) यास मोठ्या शिताफीने पकडून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित किरण गोलाईत याने ३० जानेवारीला दुपारी दहिदी शिवारात वन जमिनीलगत शेतात महिला एकटीच काम करीत असल्याचे पाहून तिला पाणी पिण्याच्या व मोरेवाडी गावचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले, सोन्या-चांदीचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिच्याशी झटापट केली. तिचा साडीने गळा आवळून व फावड्याने वार करून तिला ठार मारले. तिच्या गळ्यातील दागिने काढून घेतले. मृतदेह मोटारसायकलवर टाकून एक किमी अंतरावर वन जमिनीच्या नाल्यात घेऊन गेला. त्यानंतर करंजगव्हाण येथून कोयता खरेदी करून आणला. मृतदेहाचे दोन्ही पाय कोयत्याने घोट्यापासून कापून पायातील चांदीचे वाळे काढून घेतले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder woman with a shovel and broke her leg

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here