Home क्राईम नाशिक हादरले! भरदिवसा प्रेयसीवर खुनी हल्ला

नाशिक हादरले! भरदिवसा प्रेयसीवर खुनी हल्ला

Nashik Crime: एका सराईत गुन्हेगाराने भरदिवसा महिलेवर खुनी हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली.

Murderous attack on girlfriend in broad daylight

नाशिक:  नाशिकचा पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मित्राने खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला करणारी व्यक्ती आणि या महिला यांचे प्रेम संबंध होते. मात्र या महिलेने या इसमाला सोबत राहण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या जाधव पेट्रोलियम येथे काम करणाऱ्या जुबेदा युसूफ खान या ३७ वर्षीय महिलेचे प्रमोद प्रकाश गोसावी याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रमोद प्रकाश गोसावी यानेच जुबेदावर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुबेदा खान आणि प्रमोद गोसावी यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र, एका बलात्काराच्या गुन्ह्यात प्रमोद गोसावी याला अटक झाल्यानंतर या महिलेने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.

आपल्या सोबत राहण्यास जुबेदाने नकार दिल्याने प्रमोदला प्रचंड राग आला होता. याच रागातून या संशयित आरोपीने या महिलेला ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने जुबेदावर खुनी हल्ला केला. भर दिवसा घडलेला हा सगळा प्रकार या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला आहे.

या घटनेनंतर जखमी जुबेदा खान हिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात या महिलेच्या डोक्यावर आणि पायावर चाकुचे वार असल्याने तिला पुढील उपचारासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापनाने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  

Web Title: Murderous attack on girlfriend in broad daylight

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here