मुलानेच घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, माजी सरपंच शेळकेंचे खुनाचे रहस्य उलगडले
पारनेर | Murder: नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांचे दोन दिवसांपूवी शेतात काम करत असताना गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. या हत्यचे गूढ उकलले आहे. तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे समोर आले आहे.
राजकीय वर्चस्व, आपापसांतील भांडणातून नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांनी भाडोत्री शार्प शुटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांनी हत्या घडवून आणली होती. याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा व इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजाराम शेळके याना पॅरोलवर रजा मंजूर केली होती. वर्षभरापासून राजाराम नारायण गव्हाण येथे शेतामध्ये वास्तव्यास होता, राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल मुलगा संग्राम यांच्या मनात होती. त्याचा काटा काढणायची योजना होतीच. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध केली होती.
घटनेच्या अगोदर चार दिवस संग्राम राजाराम यांच्या मागावर होता. तो संधी शोधत होता. तो त्यांच्या शेताजवळील उसाच्या शेतात लपून बसत एकटा सापडण्याची संधी पाहत होता. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राजाराम हा शेतामधील शेततळ्याचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत होता. हीच संधी साधत संग्राम याने पाठीमागून येऊन राजारामच्या मानेवर सपासप तलवारीचे वार केले. तो जमिनीवर कोसळला. संग्राम याने त्याच्या मानेवर दोन जोरदार वार केले आणि पुन्हा उसात जाऊन लपला. संग्राम यानेच ही माहिती पोलिसांना दिली.
वडिलांच्या हत्या नंतर शांत झालेला संग्राम दुचाकीहून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रुपये काढून पानाचा आस्वाद घेतला. त्यांनतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्राम यास अटक केली.
Web Title: Mystery of former Sarpanch Shelke’s murder revealed