Home गडचिरोली जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, प्रेमसंबंधातून हत्या

जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, प्रेमसंबंधातून हत्या

Crime News:  जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश, प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट.

the mystery of the death of a young woman found half-naked in the forest is revealed, a love affair murder

गडचिरोली: जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून प्रियकरानेच तिची हत्या (Murder) केल्याचे समोर आले आहे. प्रियकरानेच ओढणीच्या सहायाने गळा आवळून खून केल्याचे कबुली आरोपीने दिली आहे.

शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळून आला होता.  ती युवती चंद्रपूर येथील रहिवासी असून वैरागड येथील तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्या युवकाला पोलिसांनी अटक (Arrested) केली.

याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. २२ डिसेंबर रोजी पोर्ला जंगलात १९ वर्षीय अनोळखी युवतीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तिच्या डोक्यातून रक्तस्राव झालेला होता, चेहऱ्यावर व्रण होते. मृत युवतीची ओळख पटवून तिच्या खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान गडचिरोली पोलिस दलासमोर होते. अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट विभागातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले.

परंतू, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरता चार तपास पथकं तयार करून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवली. दरम्यान, गडचिरोली शहरातील एका गोपनीय बातमीदाराने चंद्रपूर येथून एक १९ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मृतदेहाचे फोटो दाखवले असता मृत मुलगी त्यांचीच असल्याची खात्री नातेवाईकांनी दिली.

या युवतीचे वैरागड येथील निखिल मोहुले याच्याशी प्रेमसंबंध असून तिला भेटण्याकरीता निखिल मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने वैरागड येथून निखिल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, नंतर या खुनाची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार चाप, त्रिकांत वोर्डना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दीपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधवडे, सतीश कत्तीवार, मनोहर तोगरवार आणि गडचिरोली ठाण्याच्या पथकाने केली.

Web Title: the mystery of the death of a young woman found half-naked in the forest is revealed, a love affair murder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here