Home क्राईम एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले आणि चाकूचा धाक दाखवत महिलेवर दोघांकडून बलात्कार

एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले आणि चाकूचा धाक दाखवत महिलेवर दोघांकडून बलात्कार

Nagpur Crime Rape of a woman by two men in fear of a knife

नागपूर | Nagpur Crime: ही धक्कादायक बलात्काराची घटना वाडी पोलीस हद्दीत घडली. घरकुल योजनेअंतर्गत महिलेला घर मिळालेले असून सोमवारी रात्री २:३० वाजेच्या सुमारास पीडित 58 वर्षीय महिला घरी एकटीच होती. यावेळी दोन आरोपींनी घराचा दरवाजा ठोठावत पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला अन महिलेला चाकूचा धाक दाखवत दोन्ही आरोपींनी ५८ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने बलात्कार (rape) केला. तसेच धमकी देऊन तेथून पळ काढला. पिडीत महिला रात्रभर घाबरत घरात बसून राहिली.

मंगळवारी पिडीत महिलेने घडलेला सर्व प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्यानंतर घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.  या घटनेमुळे नागपुरात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहूही घटनास्थळी पोहोचत चौकशी सुरु केली आहे.   

Web Title: Nagpur Crime Rape of a woman by two men in fear of a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here