Home महाराष्ट्र पैशाच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने चिरला गळा

पैशाच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने चिरला गळा

Nagpur Young man Murder 

नागपूर | Nagpur: पैशाच्या वादातून चार जणांनी एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची घटना घडली आहे.

ऑटो चालवित असलेला हा अकिब अब्दुल सत्तार वय २३ असे या मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना श्रावणनगर वस्तीत मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत अकिब सत्तार आणि आरोपी प्रकाश कोसरे यांच्यामध्ये अगोदरपासूनच पैशाचे वाद सुरु होते. अकिब हा मंगळवारी दुपारी पक्याच्या घरी पैसे मागण्यासाठी गेला होता. तिथे त्यांच्यात वाद झाल्याने पक्या उर्फ प्रकाश यांच्या तीन मित्र अकिब याच्यावर सतूरचे घाव घातले. त्याचा गळा कापून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती समजताच वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे यांनी आपल्या पथकासह श्रवण नगर वस्तीकडे धाव घेतली. तसेच घटनास्थळी पोलीस उपायुक्त लोहित मतांनी आणि अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Nagpur Young man Murder 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here