Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलणार; या नवीन नावासाठी महापालिकेत ठराव मंजूर

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलणार; या नवीन नावासाठी महापालिकेत ठराव मंजूर

Breaking News | Ahmedngar Name Change: अहमदनगरचं नाव बदलून या जिल्ह्याला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” नाव देण्यात आलंय.

Name of Ahmednagar district will be changed

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या जिल्ह्याला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” नाव देण्यात आलंय. जिल्ह्याचे नाव बदलण्याचा ठराव महापालिकत मंजूर करण्यात आलाय. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेला बहुमत ठरावाची मागणी करण्यात आली होती.

चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” झाल्याची केली होती घोषणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. महापालिकेसह रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस यांचेही ना हरकत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासखात्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

मे महिन्यात आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते.

Web Title: Name of Ahmednagar district will be changed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here