Home नाशिक धककादायक! नाशिक हादरले: माय लेकींची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या- Suicide

धककादायक! नाशिक हादरले: माय लेकींची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या- Suicide

Nashik My Lake committed suicide by jumping under a train

नाशिक | Nashik News: नाशिकच्या भगूर येथील धाकाक्दायक घटनेने खळबळ उडाली आहे.  भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

अनिता बाळासाहेब शिरोळे (वय ४२) व त्यांची मुलगी राखी बाळासाहेब शिरोळे (वय २२), दोघी रा. बार्न्सस्कूलजवळ, मल्हारवाडी, भगूर) अशी मयत मायलेकींची नावे आहेत. त्यांनी रविवारी कँम्प येथील एअर फोर्स स्टेशनच्या गेट जवळील पाळदे मळा परिसरात मुंबईकहून नाशिककडे येणाऱ्या गितांजली एक्स्प्रेस खाली उड्या घेत आत्महत्या केली. याबाबत रेल्वे प्रशासनाने देवळाली कँम्प पोलिसांना माहिती कळविली.

मयत राखी हिचे वडील सोलापूर येथे खासगी ठिकाणी नोकरीला आहेत. बार्न्स स्कूलजवळ राखीसह तिची आई, भाऊ, बहीण  व चुलते राहत असल्याचे समजते. या घटनेची माहित तिच्या वडिलांना व कुटुंबाला दिली असता त्यांना धक्का बसला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपासा अंती कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Nashik My Lake committed suicide by jumping under a train

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here