Nashik Suicide News: नाशिक मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करत जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. या घटनेने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
Web Title: Nashik Three suicides in the same family
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App