Home संगमनेर मामांसाठी भाचा आला धावून, सत्यजितने काँग्रेसला सुनावले म्हणाले…

मामांसाठी भाचा आला धावून, सत्यजितने काँग्रेसला सुनावले म्हणाले…

Satyajeet Tambe:  सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

Nephew came running for uncle, Satyajeet Tambe told the Congress

संगमनेर: नाशिक पदवीधर निवडणुकीपासून (Nashik Graduate Election) राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे कुटुंब 100 वर्षांपासून काँग्रेससोबत एकत्र होतं, त्याच्यावर ही वेळ का आली याचे आत्मचिंतन कॉंग्रेसने करावे, असा सल्ला तांबे यांनी दिला आहे.

विधान परिषद पदवीधर निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात अस्थवस्थ झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही, असं स्पष्टपणे बोलून दाखवलं. आज त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते दुखावले गेले आहे.

बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं परखड मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

Satyajeet Tambe

काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितले आहे. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्लाच सत्यजित तांबेंनी दिला.

Web Title: Nephew came running for uncle, Satyajeet Tambe told the Congress

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here