Home अहमदनगर अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवरच आरोपीच्या नातेवाईकांचा हल्ला

अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवरच आरोपीच्या नातेवाईकांचा हल्ला

Nevasa  Crime accused's relatives attacked the police who went to arrest 

नेवासा | Newasa Crime:  अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर  आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.  ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गौतम नामदेव सातपुते यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.  फिर्यादीत म्हंटले आहे की,  तोफखाना पोलीस ठाण्यात 2021 मध्ये भारतीय दंड विधान कलम 420, 170, 419 आदी कलमान्वये दाखल गुन्ह्यात कौस्तुभ महेश मोडे रा. वांबोरी ता. राहुरी व सागर मच्छिंद्र धनवडे रा. भेंडा ता. नेवासा हे दोघे आरोपी आहेत. पैकी सागर मच्छिंद्र धनवडे यास सदर गुन्ह्यात अटक करण्यासाी 22 जानेवारी 2022 रोजी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांची परवानगी घेवून भेंडा येथे तपासी अंमलदार एस. एस. क्षीरसागर व व्ही. एन. केदार व मी स्वतः असे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीच्या घरासमोर पोहचलो.

आरोपी सागर मच्छिंद्र धनवडे हा घरासमोरच उभा असलेला दिसल्याने त्याला जागीच पकडून तुझ्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम420 प्रमाणे दाखल गुन्ह्यात तुला अटक करावयाची असल्याचे सांगून पकडले असता त्याने आरडाओरडा सुरु केला.

त्यावेळी त्याच्या घरातून मच्छिंद्र रामभाऊ धनवडे, सचिन ऊर्फ रुद्रा मच्छिंद्र धनवडे, सोनाली मच्छिंद्र कुसळकर व सुरेखा सागर धनवडे असे बाहेर आले. त्यांनी आमच्या मुलाला सोडा त्याला घेवून जायचे नाही असे रागाने जोरजोरात म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन ते आमच्या अंगावर धावून आले. दरम्यान मच्छिंद्र धनवडे व सचिन ऊफर रुद्रा धनवडे यांनी जवळच पडलेले लाकडी दांडके उचलून माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर जोरात मारल्याने मला मुकामार लागला आहे. तसेच सोनाली कुसळकर व सुरेखा धनवडे अशांनी माझेशी झटापट करुन माझ्या ताब्यातून आरोपी सागर मच्छिंद्र धनवडे यास सोडवले. त्यावेळी त्या महिला असल्याने मी प्रतिकार केला नाही. वरील चौघेही आम्हाला आडवे उभे राहून झटापट करु लागले. दरम्यान सागर धनवडे पळून गेला. वरील सर्वांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Nevasa Crime accused’s relatives attacked the police who went to arrest 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here