Home महाराष्ट्र राज्याचे नवे गृहमंत्री: शरद पवारांनी निवडले विश्वासू शिलेदार

राज्याचे नवे गृहमंत्री: शरद पवारांनी निवडले विश्वासू शिलेदार

New home minister of the state Dilip Walase Patil

मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्याचे नवे गृहमंत्री यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे, हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेले आहे. राष्ट्रवादीत चार नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यामध्ये शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील व राजेश टोपे यांची नवे आघाडीवर होती. त्याचबरोबर कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ( Dilip Walase Patil) यांचेही नाव चर्चेत होते.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृहविभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हंटले आहे. तसेच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत पत्रात विनंती करण्यात आली आहे.  

Web Title: New home minister of the state Dilip Walase Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here