Home अकोले लिंगदेव परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी होणार असे संकेत

लिंगदेव परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी होणार असे संकेत

अकोले(News): तालुक्यातील एक महत्वपूर्ण सुजलम सुफलम लिंगदेव गावात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अकोले तालुक्यात एमआयडीसी करणार व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असे अश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे असे अजित दादा पवार यांच्या अधिपत्याखाली अकोले तालुक्याचे लाडके आमदार डॉ किरणजी लहामटे यांनी या कार्यास सुरुवात करून काल अजित दादा पवार हे अकोले तालुक्यात एमआयडीसी सुरु करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे तसे पत्र आमदार डॉ किरणजी लहामटे यांना प्राप्त झाले आहे .त्यास त्यानी अकोले तालुक्यात लिंगदेव व भोजदरी या ठिकाणी एमआयडीसी साठी अनुकूलता दाखविली आहे ज्या गावात किमान 200 एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध होईल व त्या गावातील ग्रामस्थ सहकार्य करतील त्या गावात एमआयडीसी उभी रहाणार असल्याचे कळते आहे .एमआयडीसी मूळे अकोले तालुक्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे तरी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अनुकूलता दाखवावी अशी बाब आमदार डॉ किरण लहामटे यांनी बोलून दाखविली आहे  व त्यास लिगदेव गावातील  माळरानावर असणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपली जागा देण्यास अनुकूलता दाखवावी असे आवाहन आमदार डॉ  किरण लहामटे केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी लिंगदेव ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता .त्यावेळी सर्व ग्रामस्थ यांनी एमआयडीसी व्हावी म्हणून ठराव पास केला होता .त्यास विठ्ठल कानवडे यांनी अनुमोदन दिले होते त्यांची सर्व कागपत्र व जागेची उपलब्धता व संबंधित कागदपत्र  लिंगदेव गावात एमआयडीसी चालु व्हावी म्हणुन आज लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या कडे प्रस्ताव सादर केला गेला यावेळी विठ्ठल कानवडे, माजी पंचायत समिती जयवंत आढाव ,संजय वाकचौरे,राजु शिंदे ,का.तलाठी मंगेश फापाळे,हरिभाऊ फापाळे ,गोपीनाथ हाडवळे आदी उपस्थित होते.

Website Title: News Indication that MIDC will occur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here