Home अहमदनगर ही जोडी घरातच विवाहबद्ध, ऑनलाईन अक्षदा

ही जोडी घरातच विवाहबद्ध, ऑनलाईन अक्षदा

श्रीगोंदा(News): श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील वसंतराव निंभोरे यांचे चिरंजीव किरण निंभोरे आणि येळपणे येथील वाल्मिक डफळ यांची कन्या राणी डफळ यांनी घरातच आई वडिलांच्या साक्षीने लग्न केले आहे. या विवाहाचे फेसबुक व युट्यूब व लाइव प्रक्षेपण दाखविण्यात आले. या लाडक्या जोडीवर वऱ्हाडी मंडळीने घरात बसूनच ऑनलाईन अक्षदा टाकल्या आहेत.

किरण निंभोरे हे एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांना गाईड करण्याचे काम ते करीत असतात. लग्नातील भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्याची दोन वेळची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.

सर्वत्र लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास बंदी असल्याकारणामुळे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र या जोडीचा विवाहाचा मुहूर्त हा २७ एप्रिलला काढण्यात आला होता. यावेळी लाडक्या जोडीवर वऱ्हाडी मंडळीने घरात बसूनच ऑनलाईन अक्षदा टाकल्या. सुमारे १ हजार ५०० चाहत्यांनी आपापल्या घरी बसून ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

किरण हा युट्यूब च्या माध्यमातून एमपीएससी परीक्षेची तयारी करणारया विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे तर राणी ही मनमाड येथे पीएसआय अधिकारी आहे.

Website Title: News Online Akshada married at home Ahmednagar Shrigonda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here