Home संगमनेर संगमनेरात रेशनचा तांदूळ चोरणाऱ्यावर तीन दिवसांनी गुन्हा दाखल

संगमनेरात रेशनचा तांदूळ चोरणाऱ्यावर तीन दिवसांनी गुन्हा दाखल

संगमनेर: शहरातील पंचायत समितीजवळ लोणी ते संगमनेर हायवे रोडच्या कडेला ट्रकमधून सरकारी रेशनिंगच्या तांदळाचे पाच पोते चोरणाऱ्या शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही घटना मंगळवारी १४ एप्रिल रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली होती.

मात्र तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी तीन दिवसानंतर दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रशीद फकीर पठाण वय २६ रा. वडगाव गुप्ता नगर हा त्याच्या ताब्यातील ट्रकमधून सरकारी रेशनिंगचे ६०० पोते तांदूळ एमआयडीसी नागापूर अहमदनगर या ठिकाणाहून कोल्हार घोटी राज्यमहामार्गाने अकोले येथे जात होता. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हा ट्रक संगमनेर पंचायतीसमोर आला असता पठाण यांच्या ओळखीचा योगेश चंद्रभान भडांगे रा. अकोले रोड देवाचा मळा, संगमनेर याच्या गाडीमधून विजय कचेश्वर सोनार राहणेमळा हा ट्रकमधून तांदळाचे पोते चोरी करून टाकताना शहर पोलीस पथकास मिळून आला. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आली होती. वास्तविक पाहता लगेच गुन्हा दाखल असे वाटत होते मात्र तीन दिवसानंतर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष भालेराव शुक्रवारी वरील तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.     

Website Title: News ration of stealing rice crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here