Home अकोले अकोले: रोटरी क्लबचे “राष्ट्रबांधणीचे शिल्पकार” पुरस्कार जाहीर

अकोले: रोटरी क्लबचे “राष्ट्रबांधणीचे शिल्पकार” पुरस्कार जाहीर

अकोले (News): रोटरी क्लबच्या वतीने सन 2019-20 या वर्षीचे शिक्षकांचे  “राष्ट्रबांधणीचे  शिल्पकार” पुरस्कार जाहीर झाले आहेत.  शनिवार दि.22 फेब्रुवारी रोजी सायं. साडे चार वाजता अकोले महाविद्यालयाच्या के बी दादा देशमुख सभागृह येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधिर तांबे  व माजी आमदार  वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते व रोटरी क्लब चे अध्यक्ष सचिन शेटे  यांचे अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी मााहिती रोटरी क्लब चे सचिव डॉ.रवींद्र डावरे यांनी दिली.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे डी आंबरे पाटील,रोटरी क्लब चे उपप्रांतपाल उल्हास धुमाळ,  सल्लागार सुनिल कडलग, प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ, रोटरी चे संस्थापक  अध्यक्ष अमोल वैद्य, संस्थापक

सचिव सचिन आवारी, माजी अध्यक्ष सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रोटरी क्लब च्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.यावर्षी अकोले तालुक्यातील   16 प्राथमिक,  8 माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय  1 अशा 25 उपक्रमशील शिक्षकांना ‘ राष्ट्रबांधणी  शिल्पकार ‘या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार जाहीर झालेले शिक्षक व कंसात शाळा,महाविद्यालय पुढीलप्रमाणे-

प्राथमिक विभाग– प्राचार्या अल्फोंसा डी,(अभिनव अकोले), दिलशाद यासीन सय्यद( ज्ञानवर्धिनी, अकोले)बाळासाहेब श्रीरंग आरोटे( मुक्ताईचीवाडी,ब्राम्हणवाडा), नरेंद्र खंडू राठोड ( तिर्थाचीवाडी ,खिरविरे), बिना चंद्रकांत सावळे ( दत्तवाडी,रुंभोडी), राजू सुखदेव थोरात( खंडोबाचीवाडी,पिंपळदरी), धनंजय यशवंत गाडेकर (सोमलवाडी), नितीन उत्तमराव नेहे(सुगाव खुर्द),तुकाराम नामदेव आवारी( गर्दनी),सविता रावसाहेब वाकचौरे (पांगरी),राजेंद्र तुकाराम शिंदे(सुगाव बुद्रुक),अस्मिता प्रकाश ठुबे(हिवरगाव),विक्रम रामदास गायकर( धामणगाव आवारी), शिवाजी नामदेव शिंदे (गुहिरे), सुरेश जयराम वाकचौरे ( ठाकरवाडी,पिंपळगाव निपाणी)  व अनिल भाऊसाहेब पवार(पिंपळगाव खांड)

माध्यमिक विभाग- प्रकाश भिकाजी आरोटे(अगस्ती विद्यालय, अकोले),  केशव अर्जुन जाधव ( प्रवरा विद्यालय इंदोरी,)वंदना किरण सोनवणे( रा. वि.  पाटणकर सर्वोदय राजूर), विठ्ठल रामभाऊ शेटे(  शेषनारायन विद्यालय,कुंभेफळ ),सतीश भाऊराव काळे ( श्री स्वामी समर्थ विद्यालय,राजूर)  अनिता कचरू बेनके( न्यू इंग्लिश स्कुल निंब्रळ),अंजली विठ्ठल केळकर( राजश्री शाहू महाराज विदयालय,साकीरवाडी ), संजया धोंडिबा नवले (सर्वोदय विद्या मंदिर, आबीटखिंड)

वरिष्ठ महाविद्यालय– प्रा डॉ संजय ताकटे(अकोले महाविद्यालय,अकोले)

Website Title: News Rotary Club Citizen Sculptor announces award

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here