संगमनेर: प्रवरा नदीपात्रात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
संगमनेर: संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडी जवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये चुलत भावासोबत प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तब्बल ३६ तासंनातर मंगळवारी ता. २८ सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडी जवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये या युवकाचा मृत्यू झाला अनिल गुलाब मेहेत्रे (वय ४०,रा.मेहेत्रे माळा जोर्व्रे रस्ता )असे या युवकाचे नाव असून रविवारी दुपारी तो आपल्या तिघा चुलत भांवासह पोहण्यासाठी नदीवर गेला होता. सध्या सुरु असलेल्या तालेबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असला तरी अनेकजण प्रशासनाचे आदेश झुगारत घराबाहेर पडतात. नदीपात्रात आवर्तन सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यातच वाळू तस्करांनी नदीपात्रात ठिकठिकाणी केलेल्या खड्डयांमुळे पाण्याच्या खोलीचा नेमका अंदाज येत नाही. यामुळे नदीपात्रात पोहत असताना पाण्यात बुडाल्याने अनिल मेहेत्रे याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी पोहणाऱ्या २० युवकाच्य मादतीने नदीपात्रात अनिल मेहेत्रेचा शोध सुरु केला होता. रविवारी व सोमवारी त्यांचा निबाळे,रायते,वाघापूर शिवारात नदीपात्रात शोध घेतला. पण, तो सापडला नाही मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह तो जेथे बुडाला त्याच परिसरात आढळून आला. शहर पोलीसनी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Website Title: News Youth drowns in Pravara river Sangamner