Home अहमदनगर अहमदनगर: भाच्यानेच अडकविले मामाला हनीट्रॅपमध्ये तरुणीला पुढे करून….

अहमदनगर: भाच्यानेच अडकविले मामाला हनीट्रॅपमध्ये तरुणीला पुढे करून….

Ahmednagar HoneyTrap News: तरुणीचे काढले अश्लील फोटो, व्हिडीओ : ३० लाखांची मागितली होती खंडणी.

niece who trapped Mama by leading the young woman into the honeytrap

 

राहुरी | Rahuri : रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणीच्या मदतीने भाच्यानेच मामाला हनीट्रैपमध्ये अडकवून ३० लाख रुपयांची खंडणी मागिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या भाच्यासह तरुणीला पुणे येथून अटक (Arrested) केली आहे.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरातील एका ४० व्यापाऱ्याला एका अनोळखी तरुणीने फोन करून क्रेडिट कार्ड पाहिजे का? असे विचारले. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाली. सदर तरुणीने गोड बोलून त्या व्यापाऱ्याकडून आधी काही पैसे घेतले. दिलेले पैसे व्यापाऱ्याने परत घेण्यासाठी फोन केला असता, तिने त्याला शिर्डीला आल्यावर तुमचे पैसे देते, असे सांगितले. १७ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी त्या तरुणीने व्यापाऱ्याला कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापाऱ्याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन दारू पाली. नंतर व्यापाऱ्याबरोबर अश्लील अवस्थेत व्हिडीओ व फोटो काढून घेतले. त्यानंतर संबंधित तरुणीने व्यापाऱ्याला ‘माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर 30 लाख रुपये दे, अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करीन,’ अशी धमकी दिली. याच दरम्यान त्या तरुणीने व्यापाऱ्याकडून सुमारे ४० हजार रुपये वसूल केले. याबाबत सदर व्यापाऱ्याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा व्यापाऱ्याचा भाचाच या हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड निघाला.

पोलिसांनी फिर्यादीच्या भाच्याला ताब्यात घेतले असात, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर उपनिरीक्षक खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलि नाईक कोकेकर यांच्या पथका शुक्रवारी पुणे येथून सदर तरुणीला ताब्यात घेतले आहे. ही तरुणी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी तरुणीसह व्यापाऱ्याच्या भाच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: niece who trapped Mama by leading the young woman into the honeytrap

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here