डेल्टा प्लस व्हेरीयंटबाबत सध्या चिंतेचे कारण नाही: आरोग्यमंत्री
Delta Plus variant: आजवर राज्यात डेल्टा प्लस व्हेरीयंटचे मर्यादित संसर्ग झाला आहे. तसेच डेल्टा प्लस व्हेरीयंटबाबत ठोस अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. केवळ तर्क वितर्कच सुरु आहे.त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरीयंटबाबत जास्त चिंता करण्याचे कारण नसल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात २१ लोक डेल्टा प्लस व्हेरीयंट पोझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे सर्व जण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरीयंटबाबत चिंता करण्याचे कारण नाही. गुणधर्माविषयी स्पष्टता नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो मृत्यु फक्त डेल्टा प्लस व्हेरीयंटणे झालेला नाही. ती व्यक्ती ८० वर्षाची होती. तिला इतर स्वरूपाचे देखील आजार होते. डेल्टा प्लस व्हेरीयंटचे देशात ४८ केसेस आहे. त्यामुळे याक्षणी डेल्टा प्लस व्हेरीयंट जास्त चिंता करण्याची गरज नाही. पण सध्या कोविड नियमाचे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
Web Title: No worries about the Delta Plus variant right now