Home अकोले अकोलेत लॉज चालकांना नोटीसा; दोन लॉज चालकांवर गुन्हा दाखल

अकोलेत लॉज चालकांना नोटीसा; दोन लॉज चालकांवर गुन्हा दाखल

Akole News: अकोले शहरातील सर्व लॉज चालकांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आल्या.

Notice to Akole Lodge Drivers; A case has been registered against two lodge drivers

अकोले : महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अकोले शहरात असलेले लॉज मालक लॉजवर जागा उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास येत असल्याने तक्रार अकोले शहरातील सर्व लॉज चालकांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आल्या आहेत. तर दोन लॉज चालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

महिला अपराधासंदर्भात कोणत्याही आरोपीला सहाय्य अथवा मदत करू नये, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सहआरोपी करण्यात येईल. तसेच सर्व लॉज चालकांनी ग्राहकांना रूम देतेवेळी त्यांच्या वयाचा पुरावा व ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे. अल्पवयीन मुलींची ओळख लपविण्यासाठी इतर महिलांचे ओळखपत्र जोडले जाते. याबाबत लॉज मालकांनी दक्षता घेण्याची गरज आहे, तसेच दक्ष नागरिकांनी अशाप्रसंगी अल्पवयीन मुलीला लॉजवर घेऊन जात असल्याचे आढळल्यास तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोले पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यातील आरोपीने पीडित तरुणीला ही शहरातील गुरूकृपा लॉज येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली असल्याने लॉज चालक दत्तात्रय मारुती बनकर यांना सह आरोपी करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला शहरातील स्वागत लॉज येथे नेऊन अत्याचार केला होता. ही बाब समोर आल्याने स्वागत लॉजचे मालक सचिन पाटील काकड यांनाही सह आरोपी करण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक विजय करे, पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे, असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पोलिस उपनिरीक्षक कैलास खैरनार, तपासात नाईक विठ्ठल शेरमाळे, पोलिस बाब समोर आल्यानंतर स्वागत कॉन्स्टेबल नागरे यांनी कारवाईचा लॉजचे मालक सचिन पाटील काकड बडगा उगारला आहे.

Web Title: Notice to Akole Lodge Drivers; A case has been registered against two lodge drivers

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here