रेमडेसिवीर वितरीत न केल्याने संगमनेरातील चार मेडिकलला नोटीसा
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी चार मेडिकलला नोटीस बजावली आहे. रुग्णालयांना रेमडेसीवीर इंजेक्शन वितरीत न केल्याने साथ रोग अधिनियम अंतर्गत ही नोटीस बजावली आहे.
त्यात त्यांनी खुलासा सादर करावा असे म्हंटले आहे. सदर खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास या मेडिकलवर कारवाईसाठी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांना प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी म्हंटले आहे.
साई कृष्णा मेडिकल स्टोअर्स, ओम गगनगिरी मेडिकल, सुयश मेडिकल, बाफना मेडिकल या चार दुकानांना शुक्रवारी नोटीस बजावली आहे.
कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा कोरोना रुग्णांच्या संख्येप्रमाणे रुग्णालयांना वितरीत करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे. मात्र वरील चार मेडिकल दुकानदारांनी रेमडेसीवीर इंजेक्शन रुग्णालयांना वितरीत न केल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. मेडिकल दुकानदार उपायायोजनाची अंमलबजावणी करत नसल्याची गंभीर बाब समोर आल्याने त्यांना तहसीलदार यांनी नोटीस पाठविली आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: Notice to four Medicals in Sangamner