Home अहमदनगर नगर: कॅफेमध्ये पडदे लावून अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

नगर: कॅफेमध्ये पडदे लावून अश्लील चाळे, पाच ठिकाणी छापे

Ahmednagar Crime News:  कॅफेमध्ये अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

Obscene chala with curtains in cafe, raids at five places

अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरात कॅफेमध्ये पडदे लावून अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात बाहेरून पडदे लावून सर्रास कॅफे चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. तोफखाना पोलिसांनी सावेडीतील कोहिनूर आर्केड बिल्डींग, डाऊन कॅफे, हंगरेला कॅफे, द व्हेनी कॅफे आणि वनस्टार कॅफेवर छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी फरहाण सरफराज शेख (वय २८ वर्षे, रा. केडगाव), शक्ती मनोहर सिंग (वय २१ वर्षे, रा. भिमा सकर, राजस्थान), विशाल भाऊसाहेब पालवे (वय २४ वर्षे, रा. कोल्हार, पाथर्डी), रंजीज जवाहर पंडीत (वय २० वर्षे, रा. इंदरानगर, पुणे), ओंकार कैलास ताठे (वय २३ वर्षे, रा. ताठेनगर, सावेडी) या कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी शुक्रवारी रात्री कॅफेंवर छापे टाकले असता पडदे लावून अंधार करण्यात आलेला होता. अंधारात काही मुले व मुली अश्लील चाळे करताना दिसून आली. त्यांना समजून देऊन सोडून देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: Obscene Chala with curtains in cafe, raids at five places

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here