Home अहमदनगर प्रेमात अडथळा, सख्ख्या मोठ्या बहिणीने केला लहान बहिणीचा गळा आवळून खून

प्रेमात अडथळा, सख्ख्या मोठ्या बहिणीने केला लहान बहिणीचा गळा आवळून खून

Ahmednagar | Kopargaon Murder Case:  गळफास घेतल्याचे बनाव करीत बहिणीचा खून केल्याची घटना उघडकीस.

Obstacle in love, Sakkhya elder sister Murder younger sister

कोपरगाव: सख्ख्या मोठ्या बहिणीने आपल्याच लहान बहिणीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना तपासात उघडकीस आली असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गालगत कोकमठाण येथील भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी हर्षदा नवनाथ बानकर (वय-16) हिने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली होती.

या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला असता मयत मुलीची मोठी बहीण आरोपी श्रुष्टी नवनाथ बानकर हिचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. लहान बहिणीने तिचा मोबाईल आई-वडिलांना पकडून दिला होता तसेच तिचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले होते. आरोपी बहीण श्रुष्टी घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना मयत बहीण कु. हर्षदा बानकर हिने तिला विरोध केला होता.

त्याचा राग मनात धरून आरोपी सृष्टी बनकर हिने तिचा दि.30 सप्टेंबर रोजी साडेचार वाजेच्या दरम्यान राहत्या घरी ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर या घटनेचा बनाव करत आत्महत्या केल्याचे भासवले  मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रुष्टी नवनाथ बानकर हिच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून अधिक  तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास ठोंबरे हे करत आहेत.

Web Title: Obstacle in love, Sakkhya elder sister Murder younger sister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here