Home अहमदनगर सत्यजित तांबे यांचे सोशल मीडियात हे जुने फोटो व्हायरल, काय आहे नेमके...

सत्यजित तांबे यांचे सोशल मीडियात हे जुने फोटो व्हायरल, काय आहे नेमके प्रकरण?

Satyajeet Tambe: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोलपंपावरील फोटोला काळे फासले होते. याबद्दल त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला.

old photo of Satyajeet Tambe is viral on social media, what is the exact case

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी नाट्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या आंदोलनाचे जुने फोटो व्हायरल होताना दिसून येत आहे. २०१८ मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना सत्यजीत तांबे यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोलपंपावरील फोटोला काळे फासले होते. याबद्दल त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. आता तांबे यांना भाजपने पाठींबा देऊ केला आहे. भविष्यात ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चाही सुरू आहे. यानिमित्ताने सोशल मीडियात हे जुने फोटो व्हायरल करून या घटनेची आठवण करून देण्यात येत आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या काळात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने राज्यभर आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक कंपन्यांकडून लावण्यात आले होते. ते फलक आंदोलकांनी टार्गेट केले होते. पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. प्रदेशाध्यक्ष असलेला तांबे यांनी यामध्ये सहभागी होत संगमनेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीतील फोटोला काळे फासले होते. आंदोलनाला आक्रमक स्वरूप देण्यासाठी स्वत: तांबे यांनी त्यांच्या गाडीच्या आडोशाला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडून काळ्या ऑइलची बाटली घेतली. त्यातील ऑइल मोदी यांच्या चित्रावर फेकले होते. या प्रकरणी तेव्हा तांबे यांच्यासह चाळीस जणांविरुद्ध गैरकृत्य करण्याचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी स्वत:च फिर्याद दिली होती. त्यानुसार तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गैरकृत्य करण्यासाठी कट रचणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशी कलमे लावण्यात आली.

Web Title: old photo of Satyajeet Tambe is viral on social media, what is the exact case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here