Home अहमदनगर अहमदनगर: यात्रेसाठी निघाले अन काळाचा घाला, पिकअपचा भीषण अपघात

अहमदनगर: यात्रेसाठी निघाले अन काळाचा घाला, पिकअपचा भीषण अपघात

Breaking News | Ahmednagar: पिकअपचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

On the way to Yatra, the pick-up met with a terrible accident

अहमदनगर: नगर- कल्याण रोडवर आज शनिवारी पहाटे साडेपाच च्या सुमारास पिकअपचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की तीन जण गंभीर जखमी झाले. नगर- कल्याण रोडवर कर्जुले जवळ हा अपघात झाला असून हे प्रवासी पारनेरकडे यात्रेसाठी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे.

अधिक माहिती अशी की, अहमदनगर- कल्याण रोडवर कर्जुले शिवराजवळ अपघात झालाय. मंचरहून पारनेरच्या दिशेने येत असताना हा अपघात घडलाय. यामध्ये चिमुरडी मृत पावली. तीन जण गंभीर जखमी झाले असून एका जखमीला नगरच्या खासगी रुग्णालयात तर दोघांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत देविका अनिल फुलमाळी ही जागीच ठार झाली. चालक अनिल रामा फुलमाळी, अनिता रामा फुलमाळी , रुद्राक्ष अनिल फुलमाळी ( रा.निरगुडी, तालुका पाटोदा) हे तिघेजण जखमी झाले. या अपघातात अनिता फुलमाळी या गंभीर जखमी असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

फुलमाळी कुटुंबीय हे आपल्या मालकीच्या छोटा हत्ती घेऊन खोपोली येथे दोन दिवसापूर्वी यात्रा उत्सवासाठी खेळणीसह इतर माल विक्रीसाठी गेले होते. शनिवारी आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडला.

हा अपघात खूपच मोठा होता. अपघातानंतर पिकअप थेट खड्यात पलटी झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मदत काय सुरु केले. दरम्यान स्थानिकांनी घटनास्थळी येत जखमींना ताबडतोब उपचारासाठी हलवले होते व पोलिसांनाही याबाबत माहिती दिली होती.

Web Title: On the way to Yatra, the pick-up met with a terrible accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here