Home संगमनेर संगमनेर: बिबट्याची अवयव विक्री प्रकरणी एकास अटक

संगमनेर: बिबट्याची अवयव विक्री प्रकरणी एकास अटक

Sangamner: बिबट्याचे अवयव विक्री प्रकरणी दोघांना अटक (Arrested) करण्यात आली होती तर तिसरा फरार आरोपी याला अटक करण्यात यश आले आहे.

One arrested in case of sale of leopard parts

संगमनेर:  बिबट्याचे मृगया चिन्ह, दात, सुळे व मिशांची खरेदी- विक्रीच्या खबऱ्यामार्फत गुप्त माहितीवरुन पोलिसांनी चंदनापुरी येथे तिघांपैकी दोघांना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, फरार आरोपी सुशांत उत्तम भालेराव याला बुधवारी (दि. 12) दुपारी अटक केली. त्याला दोन दिवसांची वन कोठडी दिल्याची माहिती वन क्षेत्रपाल भाग एकचे सचिन लोंढे यांनी दिली…

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चंदनापुरी येथे शुक्रवार दि. 19 मे रोजी रात्री 10 वाजता वन विभागाला मिळालेल्या माहितीवरुन बनावट ग्राहक बनुन यशस्वी सापळा रचण्यात आला. यात दोघांना अटक करण्यात आली होती मात्र एकजण पसार झाला होता. त्याच्याकडून विक्रीस आणलेले साहित्य जप्त करण्यात आले होते.

वन विभागाने सापळा रचून हे साहित्य खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक बनून अधिकारी व कर्मचारी गेले होते. तेव्हा बिबट्याचे अवयव विक्रीसाठी श्रीराम यादव सरोदे (वय 34 वर्षे, रा. चंदनापुरी, आनंदवाडी, सुधीर विजय भालेराव (वय 30 वर्षे. (आनंदवाडी) व सुशांत उत्तम भालेराव (रा. चंदनापुरी) हे तिघे तेथे आले होते. वेषांतर करून गेलेल्या अधिकाऱ्यांनी सदर अवयव खरेदी करण्यासाठी तरुणांशी चर्चा केली. साहित्य पाहून ते बिबट्याचेच अवयव असल्याची खात्री करून आसपास इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या तरुणांवर झडप घातली. आपण पकडलो गेलो, हे लक्षात येताच त्यांनी झटापट केली. यावेळी  श्रीराम सरोदे व सुधीर भालेराव या दोघांना पकडण्यात यश आले, मात्र तिसरा साथीदार सुशांत भालेराव पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून तो पसार होता. वन विभाग त्याचा शोध घेत होता.

मिळालेल्या माहिती नुसार सुशांत शिर्डी रहात होता. तेथे कारवाई करीत बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याला पकडले. दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. उपवनसंरक्षक सुवर्णा माने व स वन संरक्षक संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेरच्या टीमसह सचिन लोंढे, वनपाल ताने, शहारून सय्यद. बुररोड, पवार, देशमुख, कोळी, सातपुते, कोरडे, श्रीमती जाधव बेंद्रे हे कर्मचारी कारवाईत सहभागी होते.

Web Title: One arrested in case of sale of leopard parts

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here