Home अहमदनगर अहमदनगर: शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू

अहमदनगर: शेततळ्यात बुडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या शेतातील मत्स्य उत्पादन करणाऱ्या शेततळ्यात बुडून (drowned) एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू (Died).

One died after drowning in the farm

कोपरगाव : तालुक्यातील मोर्वीस येथील विशाल राऊत या शेतकऱ्यांच्या शेतातील मत्स्य उत्पादन करणाऱ्या शेततळ्यात बुडून एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी ६.३५ वाजताच्या सुमारास घडली.

बुध्ददेव बच्चू वैद्य ( वय २९, रा. खेरला, राज्य पं. बंगाल ) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मोर्वीस गावचे पोलिस पाटील सोमनाथ पारखे यांच्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे करीत आहे.

Web Title: One died after drowning in the farm

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here