Home Accident News Accident: भाविकांच्या मोटारसायकलला अपघात, एक ठार एक जखमी

Accident: भाविकांच्या मोटारसायकलला अपघात, एक ठार एक जखमी

One killed, one injured in devotee's motorcycle accident

नेवासा | Nevasa:   पैठण येथे नाथषष्ठीला जात असलेल्या दोघा भाविकांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल चांदा-कुकाणा रोडवर चांदा येथे अपघात (Accident) घडला.

याबाबत माहिती अशी की,  राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील दोघे भाविक दुचाकीवरुन (एमएच 17 एडब्ल्यू 4335) पैठण  येथे नाथषष्ठी साठी जात असताना बुधवारी सकाळी 11 वाजता चांदा-कुकाणा रोडवर  चांदा गावानजिक राजेंद्र पेट्रोलपंपासमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेही खाली पडले.

यामध्ये बापूसाहेब रघुनाथ वाघ (वय 62) रा. शिलेगाव ता. राहुरी हे जागीच ठार झाले तर बंडू यादव पवार हे गंभीर जखमी झाले. दोघे एकमेकांचे साडू होते. दरम्यान सदर अपघाताबाबत सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: One killed, one injured in devotee’s motorcycle accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here