Home पारनेर हसन मुश्रीफ व अण्णा हजारे यांच्या चर्चेत हजारे निम्मे समाधानी तर

हसन मुश्रीफ व अण्णा हजारे यांच्या चर्चेत हजारे निम्मे समाधानी तर

Parner Hasan Mushrif and anna Hajare discussion

पारनेर: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. ग्रामपंचायतीवर नेमण्यात येणारे प्रशासक व ग्रामविकासावर चर्चा झाली.  ग्रामपंचायतीवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. 

न्यायालयाच्या निर्णयानंतरच प्रशासक संदर्भात सरकार निर्णय घेईल असे हसन मुश्रीफ यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. 

मुश्रीफ यांच्या भेटीनंतर आपले निम्मे समाधान झाले आहे तर निम्मे समाधान हे प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यानंतरच होईल असे अन्ना हजारे यांनी स्पष्ट केले आहे. 

हजारे म्हणाले प्रशासक पक्षाचा नसावा अधिकारी व कर्मचारी असावा असे घटना सांगते. आमचे कायदे न्यायालयाचे निकाल, राज्यापालाचे निवेदन या सगळ्यात पक्षाचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे अधिकारी अथवा कर्मचारी प्रशासक म्हणून तेथे असावेत हे मंत्री मुश्रीफ यांनी मान्य केले.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Parner Hasan Mushrif and anna Hajare discussion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here