Home अहमदनगर पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी व उपनगराध्यक्षपदी यांची झाली निवड

पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी व उपनगराध्यक्षपदी यांची झाली निवड

Parner Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor

पारनेर | Parner Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor: पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विजय औटी (Vijay Auti) तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर (Surekha Bhalekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पारनेर नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोचता आले नाही. मात्र राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेत बहुमत सिद्ध केले आहे.

आज नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी तर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेने तर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने औटी यांची निवड झाली.

वाचा: Ahmednagar News

उपनगराध्यक्षपदासाठी उद्योजक अर्जुन भालेकर यांच्या पत्नी सुरेखा भालेकर यांच्या नावावर काल राष्ट्रवादीत एकमत झाले. त्यानुसार सुरेखा भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बहुमताने निवड झाली. या बृत्ताने फटाक्यांची आतषबाजी होत आहे.

Web Title: Parner Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here