Home अहमदनगर अहमदनगर थरारक: बस चालविताना चालकाला हृद्यविकाराचा झटका आला अन….

अहमदनगर थरारक: बस चालविताना चालकाला हृद्यविकाराचा झटका आला अन….

Ahmednagar News: एसटी बस चालवतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack).

Parner driver suffered a heart attack while driving the bus

पारनेर | Parner: पारनेर बस स्थानकाबाहेर एक थरारक घटना समोर आली आहे. एसटी बस चालवतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आला. अशोक भापकर असं या चालकाचं नाव आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानं ते स्टेअरींग व्हीलवरच पडल्यानं बस अनियंत्रित झाली. मात्र प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

अशोक भापकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पारनेर बस स्थानकातून ही बस बाहेर पडताच भापकर यांना झटके येऊ लागले ते स्टेरिंग वर पडले आणि त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. बाजूलाच असलेले उदय औटी, राजू खोसे, राहुल काळे, अनिल ठोंबरे, विनायक कानडे, नितीन चेडे या दुकानदारांनी बसकडे धाव घेत केबिन मध्ये चढून बस नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या बस चालकाला पारनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Parner driver suffered a heart attack while driving the bus

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here