Home क्राईम महिला ठेकेदारास चाकू दाखवत लुटले, सोन्याचे दागिने लांबविले

महिला ठेकेदारास चाकू दाखवत लुटले, सोन्याचे दागिने लांबविले

Parner woman robbed the contractor by showing him a knife

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यात धोत्रे येथे महिला ठेकेदाराला ७ ते ६ जणांनी चाकूचा धाक दाखून २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. त्या महिलेने विरोध केला असता दोन जणांना काठीने माराहण करण्यात आली आहे.

याबाबत चंद्रकला गवळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे बुद्रुक ता. पारनेर हॉटेल अभिषेकजवळ कच्चा रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ चंद्रकला गोपाळ गवळी यांना आरोपी नामदेव उर्फ नाना व त्याचे मामा पंढरी व त्यांचे अनोळखी ७ ते ८ साथीदार यांनी चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यांचा भाऊ व बहिणीचा मुलगा यांनी प्रतिकार केला असता त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने दोन लाख तीस हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. सदर महिला ही मनेगाव ता, सिन्नर जि. नाशिक येथील रहिवासी आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Parner woman robbed the contractor by showing him a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here