Home पाथर्डी आईच्या हातातून बिबट्याने चार वर्षीय मुलाला पळवून नेऊन केले ठार

आईच्या हातातून बिबट्याने चार वर्षीय मुलाला पळवून नेऊन केले ठार

Pathardi boy was abducted and killed by a leopard

पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हाहाकार घातला आहे. गेल्या पंधरा दिवसांत काल ही तिसरी घटना घडली आहे. तालुक्यातील शिरपुरच्या पानतासवाडी शिवारात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आईच्या हातातील चार वर्षीय मुलाला बिबट्याने पळवून नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे.

सार्थक संजय बुधवंत वय ४ असे या मयत मुलाचे नाव आहे. शिरपुरच्या पानतासवाडी शिवारात तारकनाथ वस्ती येथे संजय बुधवंत राहतात. गुरुवारी सायंकाळी सार्थकाची आई त्याला अंगणात घेऊन उभी होती. त्यावेळी दबा धरून बसलेला बिबट्याने आईच्या हातातील मुलाला हिसकावून पळवून नेले. आईने प्रतिकार केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक तेथे धावून आले. त्यानंतर ग्रामस्थ, वनाधिकारी यांनी पाच किलोमीटरचा परिसरात पिंजून काढला. अखेर अडीच तासांच्या शोधानंतर सटवाई दरा येथे रक्त आढळले. रात्री उशिरापर्यंत सार्थकची शोध मोहीम सुरु होती.

गेल्या पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. मढी परिसरात एका बालिकेला उचलू नेले होते तर केलवंडी येथे ८ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Pathardi boy was abducted and killed by a leopard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here