Home अहमदनगर अशोक बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू

अशोक बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar | Shrirampur News: बंदुकीमधून अचानक गोळी सुटल्याने (Firing) नगर जिल्हा बँकेत कामकाजासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू.

person died on the spot after a bullet discharged from the gun firing of Ashok Bank's security guard

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. अशोक बँकेच्या सुरक्षा रक्षकाकडून त्याच्या बंदुकीमधून अचानक गोळी सुटल्याने नगर जिल्हा बँकेत कामकाजासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजित विजय जोशी रा. सार्वमत रोड ता. श्रीरामपूर यांचा मृत्यू झाला आहे.

अशोक बँकेचे कर्मचारी व अधिकारी भरणा भरण्यासाठी शिवाजी रोडवरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊन शाखेत आले होते. त्यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पूजारीही समवेत होते. त्याच दरम्यान बँकेच्या कामकाजासाठी श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7, सार्वमत रोडवर राहणारे अजित विजय जोशी हे आले असता ते आपले कामकाज आटोपून पार्किंगमध्ये आपली गाडी काढत असताना अशोक बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्याकडे लोड असलेल्या बंदुकीतून अचानकपणे गोळी सुटून जोशी यांच्या डोक्यात घुसून मेंदू बाहेर पडला.

रक्ताच्या थारोळ्यात अजित जोशी पडलेले होते. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना साखर कामगार रुग्णालयात हलवत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी पोहोच झाले. ज्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली ते दशरथ पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा करुन पोलिसांनी घटनेची माहिती घेतली.

सदरची घटना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे शिवाजी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हळूहळू गर्दी कमी करत वाहतुक सुरळीत केली.

Web Title: person died on the spot after a bullet discharged from the gun firing of Ashok Bank’s security guard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here