Home महाराष्ट्र जंगली रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीने गळफास लावून केली आत्महत्या

जंगली रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीने गळफास लावून केली आत्महत्या

जंगली रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार.

a person who got into debt after playing wild rummy committed suicide 

मुंबई : पैसे कमवण्याचा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जंगली रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार पनवेल येथे घडला असून, मृत व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारणही नमूद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घरात वा अन्य ठिकाणी बसून पैसे लावून रमी नावाचा जुगार खेळण्यावर कायद्यानुसार बंदी असली तरी ऑनलाईन रमीला परवानगी दिल्याने अनेक जण याकडे वळले आहेत. पनवेल येथे राहणारे संजय जुनात्रा (वय ५५) यांनासुद्धा ऑनलाईन रमी खेळण्याची सवय लागली. कमी कालावधीत आपण पैसे कमावू शकतो असे वाटल्याने त्यांनी रमी खेळण्यासाठी कर्ज काढले. ते पैसे हरल्याने अजून कर्ज काढले. मात्र रमीत त्यांना अपयश आल्याने ते कर्जबाजारी झाले. या तणावातच त्यांनी गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली.

या बाबत पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. या विषयी अधिक माहिती देताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी सांगितले की, सुनील यांना जंगली रमीत अपयश आले, त्यातून त्यांनी कर्ज काढले मात्र ते कसे फेडावे या विवंचनेत ते होते.  कर्ज काढून पैसे कमवण्याचा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला,मात्र तसे होऊ शकले नाही. पैसे कमवण्याच्या नादात जंगली रमीने मी पूर्ण उद्ध्वस्त झालो, त्यामुळे माझ्यावर झालेले कर्ज मी फेडू शकत नसल्याच्या नैराशेतून आपण आत्महत्या केली असून, आपल्या मृत्यूला आपणच जबाबदार असल्याचे सुनील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी सांगितले.

Web Title: a person who got into debt after playing wild rummy committed suicide 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here