Home क्राईम संगमनेर: पिकअपने दुचाकीस मारला कट; अपघातात एक ठार

संगमनेर: पिकअपने दुचाकीस मारला कट; अपघातात एक ठार

Sangamner Crime: पिकअपने दुचाकीस विरूद्ध दिशेने कट मारल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीवरील एक जण ठार झाला असून दुसरा जखमी.

Pickup kills two-wheeler One killed in an accident

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील निळवंडे ते जांभूळवाडी रोडवर पिकअपने दुचाकीस विरूद्ध दिशेने कट मारल्याने झालेल्या अपघातात  दुचाकीवरील एक जण ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे. रविवार  (दि.2 जुलै) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रदेशपुरा येथील अवधूत वसंत जोशी व अनुकूल सत्यभान मेंढे हे दोघे तरूण दुचाकी क्रमांक (एमएच 17 सी यु 8835) हीच्यावरून संगमनेर येथून शिर्डीकडे जात होते. रात्री साडेदहाच्या सुमारास निळवंडे  ते जांभूळवाडी रोडवर पिकअप क्रमांक (एमएच 17 बी वाय 7189) वरील चालक बाळासाहेब नामदेव हासे (रा.राजापूर) याने पिकअप भरधाव वेगात चालवून दुचाकीला विरूद्ध दिशेने कट मारला त्यामुळे झालेल्या अपघातात अनुकूल मेंढे (वय 21 रा. दारोळे वाडा घासबाजार) याचा मृत्यू  झाला असून अवधूत जोशी हा जखमी झाला आहे. याप्रकरणी अवधूत जोशी याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल एम.आर सहाणे हे करत आहे.

Web Title: Pickup kills two-wheeler One killed in an accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here