Home Accident News अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

Ahmednagar Accident:  पाठीमागून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police constable killed in collision with unknown vehicle Accident

सोनई:  अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परीसरात रविवार दि.4 रोजी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदार अनंथा बंडू गायकवाड अपघातात ठार झाले.

याबाबत राजेंद्र सुभाष दाणी (वय 41), व्यवसाय-शेती, रा. वांजोळी ता. नेवासा यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की रविवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 7.15 वाजता अनंथा बंडू गायकवाड (वय 48) रा. धोत्रे ता. पारनेर हे औरंगाबाद- नगर हायवे रोडवर नगरचे दिशेने रोडच्या डाव्या बाजूने जात असताना हॉटेल मातोश्रीसमोर पांढरीपुल शिवारात, त्यांचे पाठीमागून येणार्‍या कुठल्यातरी अज्ञात वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन पळून गेला.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 454/2022 भारतीय दंड विधान कलम 304 (अ) 279, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ), (ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. थोरात हे करत आहे.

Web Title: Police constable killed in collision with unknown vehicle Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here